|| थोडा है थोडेकी जरुरत है......||
नेटके लिहिता येना |
वाचिता चुकतो सदा |
अर्थ तो सांगता येना |
बुद्धी दे रघुनायका ||
समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकातल्या या चार ओळींचा प्रत्यय आज सारखा येतोय. कारण ज्या व्यक्तीबद्दल आज लिहायचं आहे, त्या व्यक्तीबद्दल लिहितांना सुरुवात कुठून आणि कशी करावी हेच समजत नव्हते. प्रयत्न खूप केला, सुरुवात अशी करावी का तशी करावी? सुरुवात करावी तर शब्द थिटे पडत होते. मन अत्यंत अस्वस्थ व्हायला लागल होते, सहज म्हणून हे करुणाष्टक ऐकताना हे शब्द कानी पडले अन ठरले कि याच शब्दांनी सुरुवात करावी. कारण ज्यांच्याबद्दल लिहायचंय त्याचं कार्य,त्याचा प्रवास इतका अफाट आणि प्रेरणादायी आहे की, लिहितांना शब्दांनी पूर्ण न्याय द्यायला हवा असे सतत वाटत होते.
|| शब्देविण संवादू ||
तुम्हाला न
बोलता , कुठलीही भाषा अवगत नसताना समोरच्याशी संवाद साधता येतो का ? खरतर संवाद
साधायला विशिष्ट भाषेची गरज असतेच का ? आणि तो संवाद माणसांशी असेल तर ठीक ..पण तो
संवाद प्राणी,पक्षी किंवा वन्य प्राण्यांशी साधायचा असेल तर ? त्यातल्या त्यात
एखाद्या प्राण्याविषयी फारस ज्ञान नसेल तर ? कठीण आहे...पण अशक्य नाही..इथे गरज
असेल ती फक्त झपाटलेपणाची. तरच ते शक्य होत आणि मग त्या प्राण्याच्या वा पक्ष्याच्या
अंतरात शिरून त्याच्या मनात घर करता येत.कारण सध्याच्या जगात पूर्ण शुद्ध प्रेम हे
फक्त प्राणीच करू शकतात,
आठवडी बाजार
कधी एके काळी नागपूरच्या सक्करदरा भागात प्रत्येक बुधवारी आमच्या लहानपणी आठवडी बाजार भरायचा.त्याला आम्ही बुधवार बाजार पण म्हणत. फळभाज्या,फुलभाज्या,पालेभाज्यां,रंगीबेरंगी फुलांनी,विविध खेळण्यांनी,खाऊच्या घमघमाटाने बाजार खुलून निघायचा. गावागावातून शेतकरी लोक आपापले साहित्य घेऊन विकायला यायचे ...विवीध दुकान लागायची..भांड्यांची,खेळण्यांची, कपड्यांची,भाज्यांची,फुलांची,फळांची ,मसाल्यांची. नुसता कलकलाट असायचा बाजारात.