|| आनंदयात्री ||
काही वर्षांपूर्वी नाना पाटेकरांचा पक पक पकाक नावाचा एक सिनेमा आला होता. सिनेमा साधाच होता, पण एक वाक्य त्यावेळी मनात कायमस्वरूपी घर करून गेलं, “सरतेशेवटी प्रत्येकाला आपापल्या मुक्कामाला जावच लागत. पण जगतांना एक लक्षात ठेवाव की, आयुष्य खूप सुंदर आहे ,त्याला अजून सुंदर करायाचय.”
आयुष्य
सुंदर करण्यासाठी प्रत्येकाच्या व्याख्या निराळ्या असू शकतात. कुणाला काही घेऊन
आनंद मिळवता येतो तर कुणी आयुष्यभर देण्यातच धन्यता मानतात.पण देताना निरपेक्ष
दिले तर त्याच्या आनंदाची व्याप्ती खूप मोठी असते.मी देतोय आणि म्हणून मी मोठा आहे
अशी भावना मनात येता कामा नये.आली तर तुमच देण मातीमोल झाल असच समजाव.पुन्हा एकदा
नाना पाटेकर आठवतात,ते एका मुलाखतीत म्हणाले होते की, “निसर्गाने आपल्याला दोन
हात दिले, त्याची ओंजळ करून त्यात मावेल तेवढे गरजेपुरते घ्यावे, आणि ते वाढून
खाली पुन्हा मातीत मिसळण्याआगोदर इतरांना देऊन टाकावे ,आणि आनंद मिळवावा ”. कारण
आयुष्यात आनंद आणि मन:शांती नसेल तर इतर
गोष्टींना अर्थच नाही.
‘ती’चं पण तसच आहे. तिला आपल्यातली उर्जा , आनंद , सुख देण्यात धन्यता वाटते. सतत कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे आणि त्यातून काहीतरी चांगले निर्माण करून समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणे , हेच तीच काम..तिच्या बद्दल जेव्हा मला हे सगळे कळले,तेव्हा माझ्या तोंडून एकच शब्द आला, आनंदयात्री.......बोलता बोलता अलगद तुमच बोट तीने धराव आणि आनंदाच्या गावी नेऊन तुम्हाला आनंदयात्रा घडवावी अशी ही, आनंदयात्री ....
वय....वय तसं फार नाही.....फक्त ८४...अगदीच तरुण...तरुणपणाचा संबंध इथे तुम्ही शारीरिकरित्या घेणार असाल तर चुकाल. हा संबंध येतो तो मनाशी.. शरीर थकू शकत, व्याधी येऊ शकतात ,अडथळे येऊ शकतात, पण मनाच काय ? ते थकता कामा नये. ते मात्र चिरतरुण असायला पाहिजे...’ती’च असच आहे. वय ८४ पण मन मात्र पंचविशीतलं...कुठल्याही तरुण तरुणीला लाजवेल अशी उमेद..अशी उर्जा..असा उत्साह, आणि सतत हसरा चेहरा आणि सकारात्मक विचार. सुवासिक अत्तर कसं जे आपला सुगंध संपर्कात आलेल्या प्रत्येकाला देत असत आणि मग तो सुगंध सतत दरवळत राहतो..तशी ही ८४ वर्षाची तरुण मनाची आजी , नलिनी प्रमोद कुलकर्णी , सतत लोकांना तिच्या सहवासाने आनंद , प्रेम , सकारात्मक उर्जा देते आणि जगण्याची कला शिकवते. शिकवण तसं तिच्या रक्तातच आहे म्हणा...कारण वयाची ४० वर्ष जीने विद्यादानाच पुण्यकर्म केलं, ती हे कार्य आजही उत्तमच करते आहे...म्हणतात ना खरा कलाकार आणि चांगली माणसं ही मुळात उपजत असावी लागतात..ते अस उसनं होता येत नाही.
२०१४ साली, निनाद मुळावकर, या
अत्यंत गुणी आणि तितकाच नम्र अश्या प्रसिद्ध बासरीवादकाशी माझी ओळख झाली. निमित्त
होत त्याच्या लग्नाची फोटोग्राफी...मग काय, ती ओळख छानश्या मैत्रीच्या नात्यात
बदलली आणि त्याच्या घरची सर्व मंडळी मला माझी वाटायला लागली. घरातलं सगळ वातावरणच
संगीतमय होत.त्यात भर पडली ती त्याच्या आजीची. आजी , म्हणजे आईची आई. निनाद तिच्या एक एक गोष्टी सांगत गेला आणि मी फक्त ऐकत राहिलो.
पुस्तकं, कवी, लेखक, साहीत्यिक,संगीत,सतार, निनादचा बालपणापासूनचा संगीत प्रवास, आणि
अनेक विषयांवर मी घरी गेलो की ती माझ्याशी बोलायची. त्यावेळी तीच ज्ञान, तिचा
शब्दसंग्रह, बोलण्याची उर्जा आणि सतत स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त
ठेवण्याचा खटाटोप मला एक प्रेरणा देऊन
जायचा. त्यावेळी आजीच वय होत, ७८. आणि आज आहे ८४. शरीर जरा थकलंय, संधीवाताने पाय
साथ देत नाहीत,ऐकायला अगदीच कमी येत, पण
मन मात्र अजून तरुण होतंय. उत्साह तोच. ऊर्जाही तीच.आनंदी राहण्याची आणि तो वाटत
राहण्याची कला तीने उत्तम साधली आहे. सृजनशीलतेचा खरा अर्थ इथे साध्य होताना
दिसतो. आणि हीच सृजनशीलता जपून आजी आपल्या लेखणीतून गेली कित्येक वर्ष अखंड आशयघन साहित्य
निर्मिती करतेय आणि ते लिखाण आजही तसच अविरत सुरु आहे.
पुण्याच्या भावे स्कूलमध्ये शिक्षण झालेल्या नलिनी आजीने लहानपणीच तिची गुणवत्ता सिद्ध केली होती. अगदी लहान वयात, हिंदी परीक्षेत प्रथम येत, पंडित हि पदवी मिळवली. घरी वडील पं. विठ्ठलराव सरदेशमुख, हे संस्कृत पंडित, किराणा घराण्याचे गायक आणि उत्कृष्ठ हार्मोनियम वादक. त्यांनी त्याकाळच्या अनेक दिग्गज गायकांना संवादिनी साथ केली आणि भाऊ विजय सरदेशमुख तर पं. कुमार गंधर्वांचे शिष्य होते. त्यामुळे घरात बालपणापासूनच संगीताचे वातावरण मिळाले.पुण्याला त्यांच्या घरात दर रविवारी संगीत मैफिली व्हायच्या. त्या मैफिलीत पं. भीमसेन जोशी , पं. वसंतराव देशपांडे , गानसरस्वती हिराबाई बडोदेकर गायच्या. आणि आजी तानपुऱ्याला असायची. पुढे आजी सतार शिकली. संगीताचा हा वारसा आजीने लग्नानंतरही जपला, पतीला बासरी शिकायला प्रोत्साहीत केले., ते शिकलेही. आणि नंतर मुलीलाही म्हणजे निनादच्या आईलाही सतार शिकवली. त्यामुळे संगीताचा हा वारसा पुढे निनादने घेतला आणि आज तो संगीत क्षेत्रातला एक नामवंत बासरीवादक आहे.
आजी
हा विषय तसा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. प्रत्येक घरात एक तरी आजी असतेच पण नलिनी
आजी जरा वेगळी आहे, म्हणून तर आजचा तिचाच लेख तिच्या चरणी अर्पण. आयुष्यभर न थकता,
नकारात्मक विचार मनात न येऊ देता ती सतत कुठल्यातरी कामात स्वतःला व्यस्त ठेवते. तिला
वेळ वाया घालवलेली आवडत नाही. दुपारी झोपणे आवडत नाही. प्रत्येकाने सतत क्रियाशील
असावे असे तिला वाटते, म्हणुन ती स्वतः व्यस्त असतेच पण इतरांनाही ठेवायचा प्रत्यन
करते. भल्या पाहते उठून ,देवपूजा करून ती लिखाणाला सुरुवात करते,बऱ्याच वेळ लिहून
कंटाळा आला की, लोकर घेऊन ती विणायला लागते. प्रत्येक काम विचार करून, योग्य
नियोजनाने व्हावे असे तिला वाटते. त्यात अचूकता असावी यासाठी ती प्रयत्नशील असते.
त्रास होत असूनही बसत तर कधी टेबलवर एक बोर्ड ठेवून सुंदर रांगोळ्या काढते.
निर्व्याज प्रेम करत सगळ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे मनापासून कौतुक करते.
स्वतःला जमेल तसे व्यस्त ठेवते, क्रियाशील राहते.
वाचन आणि
लिखाण हा आजीचा श्वास. संगीतासोबत तिला वाचन आणि लिखाणाची आवड आहे. चांगल्या साहित्याच
वाचन नेहमी उत्तम कलाकृती घडवते. म्हणूनच भावाने सांगितल्याप्रमाणे, गेल्या १९ वर्षापासून
आजी “जागर” या तिच्या हस्तलिखिताच लिखाण
अविरतपणे करतेय.त्यात ती स्वतःच लिखाण, तिला आवडलेले ललित लेख ,तिच्या जवळच्या
लोकांनी पाठवलेले लेख संकलित करून, कागदावर रंगीत पेनाने सुंदर नक्षीकाम करून आणि फोटोचे
कात्रण लावून ,वर्षातून तीनदा हे हस्तलिखित प्रसिद्ध करते..आणि मग ते
महाराष्ट्रातल्या मान्यवर लेखकांकडे आणि परिचित साहित्यप्रेमींना पाठवलं जात. या
हस्तलिखितासाठी विजय वाड, सदानंद डबीर, विजया राजाध्यक्ष ,प्रवीण दवणे ,सई परांजपे,
रविन्द्र पिंगे आणि अश्या अनेक मान्यवरांचे अभिप्राय पत्रांमार्फत येतात.या
हस्तलिखीताला आजी स्वतः लिहिते आणि सजवते, त्यावरची चित्र ती स्वतः काढते, गरज
भासल्यास पेपर, मासिकं यातल्या चांगल्या फोटोचे कात्रण ती जमा करते.आणि हस्तलिखीताचा
तो अंक पूर्ण करून, तो रीतसर स्वतःच्या हाताने रंगीत स्केचपेनने नक्षीदार
वेलबुट्टी काढून केलेल्या पाकिटात घालून, कुरिअर करायला सांगते. आजी म्हणते, ‘जागर’
आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया हे तीच टॉनिक आहे,त्यावरच तर ती जगते. ४० वर्ष विविध
शाळेत मराठी हिंदी आणि संस्कृत शिकवत असल्यामुळे आजीची भाषेवरची पकड अगदी मजबूत
आहे. या काळात तिने तिच्या विद्यार्थ्यांना घडवलं, शिकवलं,वाचनाची आवड लावली.तर
गरीब मुलांना मदतही केली. “गाथा एका विठ्ठलाची” हे तिने स्वतःच्या वडिलांवर लिहिलेलं पुस्तक आणि “दीपकळा स्मरणातल्या ” हे तीच आत्मचरित्र प्रकाशित झालय.
सई परांजपे वर आजीचा विशेष जीव.त्याचं सय पुस्तकाच प्रकाशन मुंबईत होणार अस कळल्यावर आजी अगदीच हुरळून गेली होती.आणि हेच पुस्तक तिला तिच्या वाढदिवसानिमित्त निनादच्या बाबांकडून भेट मिळाल.तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता. लिखाणाची आवड नलिनी आजीला होतीच पण पती सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या वाचनाच्या आवडीला जोपासण्यासाठी आणि वाचलेल्या पुस्तकांबद्दल लेखकांना पत्र लिहून अभिप्राय कळवण्यासाठी प्रोत्साहन तिने दिले . ते लिहायला लागले,त्यांचे लिखाण दर्जेदार होते. त्यासाठी ती त्यांना लायब्ररीतून पुस्तक आणून द्यायची. लिखाणासाठी लागणाऱ्या कागदांवर रात्र रात्रभर जागून सुंदर नक्षीकाम करून बॉर्डर काढून द्यायची,त्यांनी लिहिलेलं सगळे पत्र कुरिअर करायची .ते आज नाहीत, पण त्यांच्यामागे, त्यांनी पाठवलेल्या पत्रांसाठी आलेल्या अनेक मान्यवर लेखकांच्या पत्रांचा अमूल्य ठेवा, त्यांची आठवण म्हणुन आज आजीकडे आहे.
नलिनी आजी नेहमी स्वतः आनंदीपणे जगली
आणि तिने इतरांनाही जगणं शिकवल. तिने कधीच वेळ वाया घालवला नाही. कधी आकाशवाणीतून गंमत
जम्मत कार्यक्रम सादर केला तर कधी अत्रे कट्ट्यावर, वृद्धापकाळात आयुष्याची संध्याकाळ
कशी आनंदात घालवावी? ज्ञानेश्वरीतली सौंदर्यस्थळे,गावाकडच्या गोष्टी, कलाकारांच्या
गोष्टी, अश्या अनेक विषयावर व्याख्याने दिली. सतार वादन करत आनन्द मिळवला. दिवाळी
अंकात लेख लिहिले तर दासबोधाचा अभ्यास करून,त्याचा अभ्यास करणाऱ्यांना मार्गदर्शन
केले.तर कधी आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत मनमुराद गप्पा मारल्या. भगवतगीता,
ज्ञानेश्वरी, भागवत, तिला कळलेल्या अर्थासह सुवाच्च अक्षरात लिहून काढले. तर कधी
सध्या ती रहाते त्या, शहापुरच्या घराजवळ असलेल्या,पडवळ पाड्यातल्या शाळकरी मुलांशी
गप्पा मारते आणि त्यांना मार्गदर्शनही करते.तर कधी घरकामात मदत करून वेळ सदुपयोगी
लावते. दिवाळी, चैत्र, नवीन वर्षाचे शुभेच्छा पत्र ती, पोस्टकार्डवर स्वतःची कविता
करून, त्यावर सुंदर नक्षीकाम करून आजही साधरण तिच्या जवळच्या ५० मैत्रिणीं आणि
परिचितांना पाठवते. ते ही न थकता,अविरतपणे.........
म्हणतात नां , माणुस वयाने,शरीराने थकु शकतो, पण ज्याच मन सर्वांगसुंदर आणि
चिरतरुण असत, ती व्यक्ती कधीच थकत नाही. ती नेहमी इतरांसाठी प्रेरणा ठरते. तिला आयुष्य सुंदर कसं करायचं याच सूत्र नेमक कळलेल आहे. तिच्यातली उर्जा ही नेहमी इतरांना प्रभावित
करते.तिच्यातले सकारात्मक विचार नेहमी इतरांना जगायला शिकवतात.अशी ही नलिनी आजी.
जी नेहमी म्हणते की, संगीत, लेखन आणि वाचन हे जो पर्यंत मला साथ देत
आहेत तो पर्यंत माझ वय आहे, फक्त पंचवीस. ते म्हणतात ना, करणाऱ्याला चोवीस तासही कमी
पडतात,तर आळशी माणसाला एक मिनिटही एका युगासारखा वाटतो. आता ज्याच त्याने ठरवायचं कि त्यांना पंचविशीत साठी गाठायची की, साठी
उलटल्यानंतरही पंचविशीत राहून इतरांना आनंद देत जगायचं. कण्हत कण्हत जगायचं की, गाणं म्हणत जगायचं. मुळात काय तर आंनदी राहता
आलं पाहिजे आणि आनंद वाटता आला पाहिजे, माझ्या या आनंदयात्री
सारखा.........................
Wah. Lovely write up. She is a great lady. I have known the entire family since 1983. They have visited my place too. They all have a special place in my heart. My love and best regards to all. Suhas Kulkarni
ReplyDeleteThanks a lot Suhas Kulkarni
DeleteJyotsna Mulaokar
I was not knowing Nalini aaji before I went to Goregaon where Shrikant had shifted. This is God's created family. You will get pure joy in this family. Family is known for its sangeet association. No wonder. It has naturally come from Nalini aaji.its lucky to be associated with this wonderful familu
DeleteKhup Sundar lihilay ahes.. Aaji agdi jawalachi watayala lagali wachatana...
ReplyDeleteKhar ahe man tarun asayala have nahitar Halli tarunpanatahi mhatatpan yayala lagal ahe.. ashya aanandi Valli avati bhavti asatil tar he aayushy swargahun Sundar hoel😊
Aaji tumch hasya kunalahi premat padatala pures ahe... Tumhi je kartay he apratim ahe.. tumhala koti koti pranam🙏 tumcha aanadayi aashirwad sarwanwar asu dyat..
अमोल अप्रतिम .. आजी डोळ्यासमोर आल्या. भेटायला हवंय एकदा.
ReplyDeleteअप्रतिम लिखाण *****
ReplyDeleteआमचे सासरे प्रभाकर गोसावी [अण्णा]यांची सख्खी चुलत बहिण नलीनी आजी यांच्याबद्दल खूप चांगली माहिती वाचायला मिळाली खूप सुंदर लिहलेले आहे लेखकांना धन्यवाद
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteज्योत्स्ना मुळावकर
नलिनी आजीचे खूप छान वर्णन केले आहे आणि आम्ही याचा अनुभव घेतलाही आहे. आजींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteज्योत्स्ना मुळावकर
Very Nice. No words to express how wonderful our Kaku is. She is really gr8
ReplyDeleteThanks Deepa
DeleteJyotsna Mulaokar
Khup chaan Ojas. Nalini kaku is great 👍 & an inspiration to all of us 👏
ReplyDelete- Anuj Kulkarni
Thanks a lot Anuj
DeleteJyotsna Mulaokar
अतिशय छान लिहिलंय.. खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा.पुन्हा आज्जी ला भेटल्याचा अनुभव मिळाला.काही जणांचा चेहरा जरी मनात आला तरी खूप बरे वाटते...नलिनी आज्जी आणि तिचे निर्व्याज हसू..आपले नेहमीच स्वागत करत असते.
ReplyDeleteआज्जीचे लिखाण हे कौतुकास्पद...त्यांचे वय झाले असे मी कधीच म्हणणार नाही..ज्या जोशात त्या लिहित्या होतात..त्यांची हस्तलिखित त्रैमासिक म्हणजे ज्यांना वाचनाची साहित्याची आवड असेल त्यांच्यासाठी अनमोल ठेवा आहे..
खरंच या नलिनी आज्जीला त्रिवार सलाम..
खूप भाग्यवान आहे मुळावकर कुटुंबीय.. आज्जीला दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना
मनापासून धन्यवाद!
Deleteज्योत्स्ना मुळावकर
Khup mast.
ReplyDeleteVachun man prasanna jhal ani
Aaji ekdam dolyasamor asalyasarakh vatal. Ekdam asara chehra, utsah yachi prachiti vachat asatana nehmi janvate.
Great !!
Miss you Aaji and Mulaokar family !!
मनापासून धन्यवाद!
Deleteज्योत्स्ना मुळावकर
khup mnapasun dhanyawad aaji khup chan neha joshi
Deleteश्रीकांत, खूपच सुंदर व समर्पक वर्णन केले आहे आजीचे. ज्यांनी केले त्यांचे हार्दिक अभिनंदन. जगावं कसं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुमचे कुटुंब खूप नशीबवान आहे की तुम्हाला आही व्यक्ती आजी म्हणून लाभली.तिच्या विषयी वाचून खात्री पटली की जे कोणी तिच्या संपर्कात येत असतील त्या सर्वांमधये सकारात्मक ऊर्जा आपोआपच निर्माण होत असेल. आज्जी ला त्रिवार वंदन
ReplyDeleteमनापासून धन्यवाद!
Deleteज्योत्स्ना मुळावकर
किती अप्रतिम लेख आहे.
ReplyDeleteअगदी योग्य शब्दांत आजिंला डोळ्यासमोर उभे केले.
आजी खरंच खूप खूप गोड आणि amazing आहेत.
फक्त दोन चार भेटीतच त्यांच्या निरागस हास्याने आणि एका विशिष्ठ वलयलाने त्यांनी जणू मला स्वतः कढे ओढले आहे.
या लेखा मूळे त्यांची जीवन गाथा आणि प्रतिमेची एक सुंदर झलक दिल्याबद्दल लेखकाचे आभार.
येत्या काळात आजीसोबत छान वेळ घालवायची मनापासून इच्छा आहे.
या थोर अशा आनंदयात्रीचे
सानिध्य मला लवकरात लवकर लाभो.
प्रिया
मनापासून धन्यवाद!
Deleteज्योत्स्ना मुळावकर
अतिशय छान लिहिलंय... एक एक पैलू उलागडला
ReplyDeleteआजींच्या जीवनपटाचा...
आजींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.
आणि येणाऱ्या तुझ्या सर्व लेखांसाठी तुला शुभेच्छा..
खूप छान आणि प्रेरणादायी, आजींना मन:पूर्वक नमस्कार.
ReplyDeleteगोराआजींचा आणि आमच्या ऋणानुबंधाला जवळपास २७ वर्षे झाली. आनंदयात्री नलिनीआजी म्हणजेच आम्हां सर्वांच्या गोराआजी. गोरेगावला रहात असत म्हणून गोराआजी!
ReplyDeleteनिखळ हसू आणि सळसळता ऊत्साह म्हणजे गोराआजी!
कित्येक घटनांचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. ह्या सर्व आठवणींंची गोडी अवीट आहे.
आजींचा हा ऊत्साह वर्षानुवर्षे तसाच आहे ह्याला अजूनही एक कारण आहे ते म्हणजे माझ्या जाऊबाई सौ.ज्योत्स्ना मुळावकर आणि श्री. श्रीकांत मुळावकर म्हणजे गोराआजींची लाडकी लेक आणि जावई!
अनेक वर्षे आम्ही पाहत आहोत दोघेही अतिशय आनंदाने, न कुरकुरता, हसत-खेळत आजींचे सर्व बालहट्ट आपापली नोकरी सांभाळून पूर्ण करायचे. आता तर दोघांनीही आजींच्या सेवेला वाहून घेतले आहे. आनंदयात्रीला सतत आनंदी ठेवणारे हे दोन महत्त्वाचे सहप्रवासी!
गोराआजीला नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा! आणि वहिनी भाऊजींच्या कार्याला सलाम!
आपले :राजश्री आणि राजू मुळावकर.
मनापासून धन्यवाद
Deleteज्योत्स्ना मुळावकर
Aaji aani tuza Likhan Apratim aahe.
ReplyDeletebahot accha Varshaji...
DeleteGreat spirit.. (mani)
ReplyDeleteEnjoyed reading it. Made me quite emotional after a long time. She is very cheerful & positive. Quite difficult to achieve such a great attitude. 🙏
ReplyDeleteThanks a lot
DeleteJyotsna Mulaokar
Very nice,great Aaji
ReplyDeleteव्वा खूपच सुंदर लेख आहे शब्दांकन पण खूपच खुरेख आहे आणि तू असेच छान माहीती देतजा तेथे कर आमचेही आपोआप जुळतात आणि प्रेरणा ही मिळते छान 👍👍
ReplyDeleteखूप सुंदर वर्णन. प्रत्यक्ष आजी भेटल्या. त्यांचे निर्व्याज्य विलोभनीय हसू.या वयातही आनंदाने धडपड करतात.स्वताःचे छंद उल्हसित होउन जपतात हे बघून आपल्यालाही उत्साह येतो.आजींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteWa आनंदयात्री लेख वाचला , आणि माझा उर भरून आला, ज्या व्यक्तीला अनंत वर्षे जवळून पाहतो, त्यांचा हा आनंददायी प्रवास वाचताना नकळत मन मागे धावते आणि पुन्हा त्याच प्रवासाची उजळणी होते. आमची शीलावहिनी अशीच सतत कार्यरत असलेली , आणि ती ऊर्जा सर्वांना देणारी !!! तिच्या पाठीशी तिची लाडकी लेक आणि जावई ( म्हणायला फक्त) सतत असेच कार्यात भर घालणारे आहेत. त्याही दोघांचा अमूल्य वाटा अताच्या नवीन पिढीला प्रेरणादायी आहे !!! त्या सर्वांनाच प्रथम सलाम !!! आणि शीलवहीनीला शिर साष्टांग नमस्कार !!!!
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteज्योत्स्ना मुळावकर
Today I understand why this family is do much sangeet focussed. This all has come from Nalini aaji. My dear friend Shrikant is a good singer. But it was God',wish that all new entrants in the family were also sangeet focussed. Aaji is amazing. Chirtarunya is aaji's another name. It's wonderful that a person can be so energetic at this age. Great. I am fortunate to be associated with this God gifted family.
DeleteThanks a lot
DeleteJyotsna Mulaokar
कोणत्याही वयात कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी आणि उत्साही कसे राहू शकतो याचा धडाच आपल्याला मिळतो खूप छान लेख आहे
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
ReplyDeleteज्योत्स्ना मुळावकर
DeleteKhup sundar ligilay, agadi dolyasamor ubhe rahate sagale. Great absolutely ����
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteज्योत्स्ना मुळावकर
Khup sundar. Purviche Divas athavle.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteज्योत्स्ना मुळावकर
आजीचा सहवास आम्हाला लाभला ..आमचे भाग्य आहेत .
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteज्योत्स्ना मुळावकर
(मालकीण बाईंची मुलगी मिरा)(सुधा मावशीची धाकटी बहीण)
ReplyDeleteफारच सुंदर... अवर्णनीय आणि साध्या रोजच्या व्यवहारांतील शब्द त्यामुळे समजावयास अगदीच सोपे आणि मनात रुजणारे..... सबंध नलूचे सरदेशमुखांचे आयुष्यच डोळ्यासमोर उभे राहिले. त्याच आठवणीत रममाण झाले.
शहापूरला यावयाची खूपच जबरदस्त इच्छा आहे. बघुयात कधी योग येतो ते.
* माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे, म्हातारे नाही....*
Delete*वय वाढणे हा निसर्गक्रम आहे म्हणून आपण स्वत:ला ‘आता आपण म्हातारे झालो’ असे म्हणू नका.....
* ज्येष्ठत्व व म्हातारपण यांतील फरक समजून घ्या.*
* म्हातारपण इतरांचा आधार शोधीत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते.*
* म्हातारपण लपवावेसे वाटते, तर ज्येष्ठत्व दाखवावेसे वाटते.*
* म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असते, तर ज्येष्ठत्व अनुभवसंपन्न, विनम्र व संयमी असते.*
* विचारले तरच ज्येष्ठ व्यक्ती सल्ला देते वा सुचविते.*
* म्हातारपण जीवनाच्या संध्याछायेत मरणाची वाट पाहत दिवस काढते, तर ज्येष्ठत्व संध्याछायेत उष:कालाची वाट पाहत बालांच्या क्रीडा, तरुणांचे दीपवणारे कर्तृत्व कौतुकाने पाहत आनंदाने, समाधानाने जीवन जगते.*
* म्हातारपण तरुणांच्या जीवनात लुडबुड करते, तर जेष्ठत्व तरुणांना त्यांच्या मताप्रमाणे जगण्याचा अवकाश देते.*
* म्हातारपण 'आमच्या वेळी असे होते...' अशी किरकिर लावते, तर जेष्ठत्व बदलत्या काळाशी जुळवून घेते.*
* म्हातारपण आपली मते तरुणाईवर लादू पहाते, तर जेष्ठत्व तरुणाईची मते जाणून घेते.*
* म्हणूनच ज्येष्ठांनो, मानाने, आनंदाने, समाधानाने जगा. तुमचा अनुभव व ज्ञान, सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबाला आणि समाजाला द्या. म्हातारे होऊ नका तर जेष्ठ व्हा.*
* चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी कपाळावर (नापसंतीच्या आठ्या ) स्पीड ब्रेकर्स पडू देऊ नका. आपली दु:खे उगाळीत बसू नका. मितभाषी व्हा. जीवन आनंदी व सुंदर आहे. जगाबरोबर जगण्याचा प्रयत्न करीत राहा.*
*मित्रांनो, प्रत्येक घरातील जेष्ठांनी असे राहायचा प्रयत्न केला तर संध्याछायांना न भिता त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांनाही समृद्ध जीवन जगता येईल, आणि त्यांच्या जीवनात आनंदाचा झरा वाहू लागेल, हे निश्चित.*
आजींचे फार चांगले वर्णन..We all family friends met her twice thrice. She is so enthusiastic at her age in her working , creativity. Lot of respect for her. One should inspire , learn from her that age is never boundary for to contribute, work.
ReplyDeleteThanks a lot
DeleteJyotsna Mulaokar
Hello Amol ..Khoop chan likhan share kelas Respected Aajin baddal.. Khoop shikanyasarkha aahe tyanchya kadoon. Bahutekani tyana bhetnya chi ichha vyakta keli.Mala pan awadel. Aajina Namaskar.Best wishes to you.. Thanks.. Manish Desai
ReplyDeleteअप्रतिम लेख आणि आजींचे केलेले वर्णन सुंदर. खरेच आजींचा हया वयातला उत्साह अतिशय वाखाणन्याजोगा आहे. पूर्ण लेख वाचल्यानंतर शहापूरच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अनुज, तू अतिशय नशिबवान आहेस कारण अश्या प्रतिभावान आणि अतिशय निर्मळ मनाच्या लोकांचा तुला सहवास लाभला आणि आम्ही भाग्यवंत कारण तुझ्यामुळे आम्हालाही थोडासा लाभ मिळाला. सरांसारख्या, मुळावकर कूटुंबियासारख्या पवित्र आचार विचार असलेल्या लोकांचे सानिध्य लाभणे हा दैवयोग आणि आम्हाला अंशता का होईना तो लाभला हे आमचे भाग्य. आजींची आनंदयात्रा अशीच इतराना प्रेरणा देत अविरत सुरू राहो ही इश्वरचरणी प्रार्थना.
ReplyDeleteAnand
Aanand
DeleteThanks a lot
Jyotsna Mulaokar
खूपच छान ! जागरची तर मीही साक्षीदार आहे. खूप छान लेखन नि संकलनही! कधी तरी कळत नाही , इतकी ऊर्जा येते कुठून ? खरंच खूप शिकण्यासारखं ,अनुकरणीय!! भेटायची खूप इच्छा आहे!!
ReplyDeleteप्रत्यक्ष चरणस्पर्श त्यातला आनंद घ्यायचा आहे, बघूया योग कधी आहे! ऊत्यत्साह ताजा तजेलदार ठेवणारे टाॅनिक म्हणजे निनादची आजी!! साष्टांग प्रणाम!!
ReplyDeleteमी शोभा नाखरे
ReplyDelete