आउट ऑफ द बॉक्स.....
बालपणी प्रत्येकाने ‘आपण या समाजात राहतो, या समाजाचे देणे लागतो’ हे वाक्य कितीदा तरी ऐकल असेल. पण खरच किती लोकांना मोठेपणी या वाक्याचा अर्थ समजला की, नेमकं काय देण लागतो आपण या समाजाच ? खर तर हे अस कोड आहे जे उलगडल तर आयुष्याच सोनं होत. कारण या कोड्याच्या अंती एक गोष्ट लक्षात येत की, ज्याला निरपेक्ष देण समजल त्याला सर्व कळल. त्याला काही मागायची गरजच राहत नाही. इथे विज्ञानातला रिव्हर्स थेअरीचा नियम लागू होतो. तुम्ही जे द्याल..ते फिरून फरत तुमच्यापर्यंत येत,,हे नक्की. फक्त काय द्यायचं, हा मात्र प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न....कारण जे द्याल तेच परत फिरून येईल...
प्रश्नावरून आठवलं, माझा ५ वर्षाचा मुलगा सतत काही ना काही प्रश्न विचारातच असतो. हे असेच का? कोण? कशाला ? कधी? कसे? काय? त्याची उत्तर देता देता माझ्या नाकी नऊ येतात पण त्याचे प्रश्न सुरूच असतात. त्याच्या बालबुद्धीला पडणारे हे प्रश्न त्याच्या जिज्ञासूवृत्तीचे समर्पक दर्शन मला देऊन जाते. हे प्रश्न निर्माण होण म्हणजे तुमची बुद्धी सक्रीय आहे. आणि ती मिळेल त्या माध्यमाने उत्तरांचा शोध घेऊ पाहतेय. यातूनच निर्माण होते, सृजनशीलता.
वय २८...आणि त्याच्या नावावर नोंद झालेले आजपर्यंतचे पेटंट २४. हिशोब केला तर वय आणि पेटंट यात फक्त ४ वर्षाचा फरक. आणि या २४ मध्ये चोविसावा पेटंट आहे तो, सध्याच्या कोव्हीड-19 बद्दलचा. त्याने कोव्हीडसाठी डिसइन्फेक्शन चेंबर तयार करून त्याचही पेटंट घेतलय. अत्यंत कमी वयात सर्वाधिक पेटंट घेणारा हा अवलिया आहे, अजिंक्य रवींद्र कोत्तावार. संपूर्ण भारतात, इतक्या कमी वयात २८ पेटंट मिळवणाऱ्या अजिंक्यच्या संशोधनाची दखल ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ यांनीही घेतली. आणि त्याचे नाव या दोन्ही नामांकित बुक रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अजिंक्यला विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी २०२० या वर्षी भारत सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराचे नामांकन जाहीर झाले आहे..इतक्या कमी वयात पद्मश्री साठी नामांकन मिळवणे ही खरच अतिशय स्तुत्य आणि तितकीच गर्वाची सुद्धा बाब आहे.
अजिंक्यच्या बालपणात या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळतात.. त्यालाही प्रश्न पडायचे...पण इतरांपेक्षा नेहमी निराळे. शाळेत त्याचे कधी मन लागत नव्हते. त्याला बाहेर जे दिसत ते तस का ? कसे ? असे प्रश्न पडायचे. त्याला मोकळ जगायचं होत,मनस्वी जगता जगता प्रश्नांची उत्तर शोधायची होती. पारंपारिक शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिक शिक्षणावर त्याचा भर होता. तुम्हाला थ्री इडियट्स सिनेमामधला एक संवाद आठवतो का?..आमीर खान म्हणतो , “ग्यान हर जगह बट रहा है,,,जितना चाहे समेट लो.” अजिंक्यचे तसेच होते . त्याची उत्तर तों सभोवतालच्या निसर्गात शोधायचा. एखादी समस्या आली किंवा प्रश्न निर्माण झाला तर तो त्याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्याचा शोध घेत राहायचा. यातूनच त्याचा आतला संशोधक जन्माला आला. शाळेत त्याचे मन लागत नव्हते. साधारण तिसऱ्या वर्गात असताना, अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून त्याची आई त्याला नागपूरला एका ज्योतिष्याकडे कडे घेऊन गेली. तिथेही त्याचे लक्ष नव्हते.पण भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण बोलण्यात त्याला फक्त एकच शब्द लक्षात राहिला तो म्हणजे हा मुलगा शास्त्रज्ञ होईल. आणि त्याने तेवढाच शब्द लक्षात ठेवला. आणि त्याच्या संशोधक वृत्तीचा प्रवास इथून सुरु झाला.
पुढे सहाव्या वर्गात असताना, एकदा अजिंक्यच्या लक्षात आल की, चहापत्ती दिव्याच्या वातीवर धरली तर त्यातून ठिणग्या निघतात. याचे नीट निरीक्षण करून त्याने ते नोंदवले. आणि पुढे M.Tech. करायला आसामला सिलचर येथे गेल्यावर, तिथल्या चहाच्या बागेत फिरत असताना त्याच्या लक्षात आले की,चहाच्या झाडावर असलेली फक्त वरची तीन पानं तोडून त्यापासून चहा तयार केला जातो..म्हणजेच खालची पानं हि कुठल्याही कामासाठी वापरल्या जात नाही.त्याचा कचरा बागेत पडून असायचा आणि त्याला जेव्हा जाळायचे तेव्हा त्याचा एक विशिष्ट आवाज यायचा. तेव्हा डॉ. निशिकांत देशपांडे यांच्या मदतीने त्याने त्याचा फॉर्म्युला शोधला, ज्यात त्याला हायड्रोकार्बन सापडले..म्हणजेच यापासुन बायोडिझेल तयार करता येईल या निष्कर्षावर तो पोहोचला..आणि त्याने त्यावरचा संशोधन प्रबंध तयार केला.
अजिंक्यच बालपण विदर्भातल्या, यवतमाळ जिल्ह्याच्या पाटणबोरी, या गावी गेल. निश्चितच गांव म्हटलं की, त्याकाळी तिथे काही समस्या होत्याच. या समस्यांवर काही उपाय शोधता येईलं का? यासाठी त्याचे बाल मन नेहमी शोध घेत असायचे. नदीकाठी जाऊन बसणे, सायकल रिपेरींगच्या दुकानावर जाऊन ते काम बघणे, आणि घरी स्वतःची सायकल रिपेअर करून बघणे, दिव्यावर कचरा धरून त्याचा आवाज ऐकणे आणि त्यातून काही नाविन शिकता येइल का ? याचा शोध घेणे..हेच त्याचे काम असायचे..गावात महिलांना दूरवरून प्यायचे पाणी घागरीने भरून आणावे लागायचे.आणि तेही अशुद्ध पाणी असायचे. यावर उपाय म्हणुन २०१५ ला, त्याने सहज ढकलून नेता येईल आणि घरंगळत जाताना त्याच्या आतल्या फिल्टरने अशुद्ध पाणी गाळून शुद्ध होईल असा ड्रम शोधून काढला.आणि त्याचे पेटंट घेतले.
अजिंक्यला अंतराळ विज्ञानात आवड होती..त्यातले गूढ त्याला नेमही आकर्षित करायचे..पण ही नेमकी दिशा नव्हती..म्हणून त्याच्या आई वडिलांना वाटायचे की, अजिंक्यने किमान पदवी पर्यंत शिक्षण तरी घ्यावे,,म्हणुन त्याने यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा महाविद्यालयात मेकँनिकल इंजिनियरींगला प्रवेश घेतला..पण तिथे थेअरी अभ्यास करायला मिळाला. त्याला इंजीनियरिंगच्या हत्यारांचा वापर करायचा होता..तेव्हा त्याने नागपूरच्या व्ही. एन. आय.टी. महाविद्यालयात तशी परवानगी घेतली..विज्ञानात तशीही आवड होतीच, ती आवड इथे अधिक विस्तारली. यानंतर तो आसामच्या सिलचर येथे M.Tech. करायला गेला. इथेच त्याने चहाच्या पानांपासून बायोडिझेल तयार करण्याचा शोध लावला..पण काही कारणाने तो पूर्णत्वास गेला नाही.त्याचा प्रबंध पूर्ण झाला..पण त्याला M.Tech चे शिक्षण अर्ध्यात सोडावे लागले.
अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नावावर तब्बल ३५०० पेटंट आहेत. असे म्हटल्या जाते की, आईनस्टाईन यांची बरोबरी करणारा सध्यातरी कुणी नाहीय.पण अजिंक्य मात्र त्यांच्याच पावलावर पाउल टाकत संशोधनाचा प्रवास करतोय. वयाच्या २५ व्या वर्षी आईनस्टाईन यांनी १५ पेटंट आपल्या नावावर घेतले होते,, तर त्याच वयात अजिंक्यनेही १२ पेटंट रजिस्टर केले. कारण विचार हे सामान्य असले तरी ते नेहमी ‘आउट ऑफ द बॉक्स’असावे लागतात,तरच इतिहास घडतो. विज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन संशोधन होतात. अश्या क्षेत्रात जिद्दीने आणि कसोशीने काम करावे लागते तरच यश हाती लागते. आणि असे यशस्वी आणि दर्जेदार प्रयोग करून, समाजहित जपणारा अजिंक्य एकमेव युवक आहे.
जिज्ञासू वृत्तीच्या या विदर्भवीराने आजपर्यंत जे संशोधन केले ते स्वतःसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी केले.त्याला महाराष्ट्रातच राहून हे करायचे आहे.आपल्या बोलण्यात अजिंक्य नेहमी म्हणतो की, इंजिनियरींग झाल्यावर नोकरी कर असा तगादा लावण्यापेक्षा , आईवडिलांनी तुला जे आवडेल ते कर असे सांगितले.म्हणूनच आज मी हा २४ पेटंटचा टप्पा यशस्वीपणे पार करू शकलोय आणि नव्या संशोधनांचा प्रवास असाच सुरु आहे. बाहेरच्या देशातून गलेलठ्ठ पगाराच्या अनेक नोकऱ्या त्याला येतात.पण अजिंक्यला बाहेर जाण्यापेक्षा आपल्या देशासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी अजून बरेच काही करायचे आहे.
वाहनांची कार्यक्षमता वाढवणारे इंजिन.....पेट्रोल+डीझेल असे इंजिन....धावत्या गाडीतून वीजनिर्मिती... हायड्रोमॅग्नेटीक ब्रेक सिस्टीम...इको फ्रेंडली कुलिंग ॲन्ड हिटिंग सिस्टीम फॉर कॅबिनेट....पोर्टेबल रिन्युएबल बॅटरी चार्जर युजिंग वाईड एनर्जी....इंटरनल फंक्शन इंजिन... लोणी काढायचे आधुनिक यंत्र...ॲक्सिडेंटल ॲन्ड थेप्ट अॅलर्ट फॉर व्हेइकल...ॲनिमल रीपेलन्ट...डिजिटल बायोमॅट्रिक व्होटिंग सिस्टीम....पोर्टेबल वाॅटर प्यूरिफिकेशन वाॅटर बाॅटल...पाणींटंचाई विभागासाठी चाकाचे ड्रम...डोअर कम गेमिंग झोन....बॅटरी ऑपरेटेड टी. व्ही. ....वाॅटर फ़िल्टर मेब्रेन वाॅशिंग ॲन्ड क्लिनिंग मशीन ...रेल्वे करीता अतिरिक्त बर्थची व्यवस्था... द्रव पदार्थांद्वारे विजेचे वहन... आणि अगदीच नवीन आणि अत्यंत गरजेचे कोव्हीड-१९ साठी डिसइन्फेक्शन चेंबर अश्या अनेक संशोधनाचा उपयोग भारतासाठी आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला व्हावा असे अजिंक्यला वाटते. तो म्हणतो माझे ध्येय पक्के आहे. मी माझ्या गावात सामान्य लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रास सहन करताना जवळून पाहिले आहे. तेव्हा हे सगळे फक्त जनतेसाठी. इतर देशात सोयी, समृद्धता आहे, ती समृद्धता मला इथे आणायची आहे.आणि मी त्यासाठी सतत प्रयत्नशील असेन. आगरतळ्याला बाम्बुंच्या वस्तूंची निर्मिती होते, हे काम अधिक सोयीस्कर रित्या काम करता यावे यासाठी त्याने तिथल्या कामगारांना फोटो केमिकल मशिनच्या सहाय्याने बांबू कटिंग करायला शिकवले.
अजिंक्य म्हणतो, गणितातले प्रमेय, पायथागोरसचा सिद्धान्त, रोजच्या जीवनात कसे उपयोगी पडतात,पुस्तकातल्या थेअरी दैनंदिन जीवनात कशा उपयोगी असतात याचे शिक्षण आम्ही या संस्थेद्वारे देतो. दहावीत दोनदा नापास झालेला विद्यार्थी वा शिक्षणात फार इच्छा नसलेले विद्यार्थी सुद्धा आता अजिंक्यकडे प्रयोगातून शिकून चांगल्या प्रकारे तयार झाले आहेत. आज पर्यंत या मार्फत साधारण ५५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संशोधनाची गरज का भासते. ? ते का महत्वाचे ? कसे करावे? यावर मार्गदर्शन झालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांशी शाळा शाळांमधून संवाद साधला जातो.आतापर्यंत साधारण पंचवीस हजार विद्यार्थ्यांशी संपर्क झला असून,१२५ मुलांची टीम तयार झाली आहे.अजिंक्यच्या मदतीने ही मुल त्यांच्या प्रश्नाची उत्तर शोधु लागली. आणि त्या त्या क्षेत्रात संशोधनही सुरु केले.आणि त्यातून १२ पेटंटही त्यांनी मिळवले. याचसोबत अजिंक्यने नागपुरात सॉफ्टसेन्स टेक्नोसर्वचे संचालक डॉ. विशाल लिचडे यांच्या सोबत संशोधन विभाग सुरु केला.या मार्फत अंध –अपंग आणि कुष्टरोग्यांसाठी विविध उपयोगी उपकरणे तयार करण्याची अजिंक्यची इच्छा आहे.काही विद्यार्थ्यांना घेऊन त्याने ते काम सुरु पण केले.
अजिंक्यच्या नावावर आता पर्यंत एकूण २४ पेटंट आहेत.त्यापैकी त्याने अवघ्या 5 वर्षात १२ पेटंट आणि एकाच दिवशी ४ पेटंट रजिस्टर केले. एडिसन आणि आईनस्टाईन यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली. अजिंक्यला त्याने केलेल्या कार्यासाठी म.टा. सम्मान युथ आयकॉन, Entrepreneurs’ International 2019” in the field of “excellence in Entrepreneurship in research and innovation” , झी युवा सम्मान , Mayor innovation Award 2019”, “Young Achievers Award 2018” , “SAKAL SANMAN 2018” अश्या अनेक सम्मानाने गौरवण्यात आले आहे.
अजिंक्यला वाटत की, एखाद्या विद्यार्थ्याला, त्याला मिळणाऱ्या कमी गुणांमुळे कुणी ओळखू नये..ते गुण फक्त त्या वेळेपुरते मर्यादीत असतात.गुणवत्ता हि त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात असते,,खर तर ती प्रत्येकात असते..पण आपण प्रत्येकाची गुणवत्ता एकाच निकषाने मोजतो...तसे न बघता त्या विद्यार्थ्यात वेगळे काय आहे,,,काय नेमके खास आहे हे बघावे,,आणि त्या गुणांना प्रोत्साहन द्यावे.त्याला त्याच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असेल त्या गोष्टी कशा उपलब्ध करून देता येईल हे बघावे. शिक्षण पद्धती बदलून ती पूर्णतः प्रात्याक्षिक पद्धतीने पुढे यावी.
लद्दाख मध्ये शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करून नवी प्रयोगशील शिक्षण पद्धत विकसित करणारे सोनम वांगचुक हे त्याचे आदर्श आहेत..खरे तर हे आपले दुर्दैव आहे की, सोनम वांगचुक या सारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाला खरी ओळख तेव्हा मिळते जेव्हा कुठला तरी सिनेमा स्टार त्यांच्या कार्यावर आधारित सिनेमा करतो. फुंगसुक वांगडू हे पात्र आधी जन्माला याव लागत , तेव्हा सोनम वांगचुक हे कळतात. तोंपर्यंत ते फक्त लद्दाख पर्यन्तच मर्यादित असतात. पण ही एक चांगली सुरुवात होती. आज सोनम वांगचुक हे नागपुरात येतात ते अजिंक्य साठी.. आणि ही अजिंक्यच्या कार्याला लाभलेली खूप मोठी पोचपावती आहे. आज अजिंक्यला लोक महाराष्ट्राचा रँचो, विदर्भाचा फुंगसुक वांगडू म्हणून ओळखतात ते त्याच्या कामगिरीसाठी.कारण आपल्याला फिल्मी दुनियेतली नाव लवकर लक्षात राहतात. असो...समाजाच हे देण अजिंक्यला नेमक समजलंय. त्याच हे कार्य असेच दिवसेंदिवस मोठ होवो आणि त्याची कीर्ती दूरवर आसमंतात पोहोचावी हीच इच्छा.......
अजिंक्य कोत्तावार यांचे खूप खूप अभिनंदन, वयाच्या २८ व्या वर्षी,२४ पेटंट मिळाले,हे अद्भुत आहे,सामाजिक जाणीव उराशी बाळगून त्यांचे कार्य चालू आहे हे महत्त्वाचे. त्यांच्या कार्याला सलाम आणि मनापासून शुभेच्छा.
ReplyDeleteज्योत्स्ना मुळावकर.
कार्याला सलाम आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...
ReplyDeleteI really appreciate by heart for this unbelievable social contribution ..yes he is "WINNER STAR".
ReplyDeleteAfter reading overall article, thousand question comes in mind..like Can we do something our society. As a citizen our responsibility should be..
After reading this article written by Amol
That we need to do some thing about society..no matter what kind of help ..our small help also can change society.
Heartily congratulation to golden Ajinkya Tara and very thankful to mr. Amol who is taking initiative of those people who doing something great beyond expectations for society and giving inspiration.
Salute for great contribution for society.
अजिक्य दादा आपल्या कार्य कर्तुत्वास सलाम... आली भेट अमोलच्मा माध्मायतून झाली. आपल्या गरिब आणि ग्रामीण मुलांसाठी प्रेरणा आहे.
ReplyDeleteअमोल सुंदर लिखान.. अशी माणसं समाजापूढे या माध्यमातून ..आणण्यासाठी
ReplyDeleteखूपच सुंदर लेख अजिंक्य चे हे कार्य दिवसन दिवस पूढे वाढो हीच सदिच्छा 👍
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteवाह अप्रतिम लेख
ReplyDeleteSimply amazing.keep it up.
ReplyDelete