कोरोनाच्या सुट्टीतली ऑनलाईन शाळा.
साधारण
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनामुळे (Corona-Covid-19) सगळं जीवन एकाच जागेवर
थांबल्यासारख झालं आहे. परिस्थिती पूर्ववत कधी येईल कुणालाच माहिती नाही. फक्त
अंदाज बांधण्याशिवाय पर्यायच नाहीय. हवेतली पतंग उंच आकाशी जाते पण तिचा जसा नेमका
ठावठिकाणा नसतो, कुठलाच अंदाज बांधता येत
नाही, तसं सध्या सुरु आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी परिस्थितीशी जुळवून घ्यायला सुरुवात
केली आहे. पण दैनंदिन कामं थांबून कस
चालेल ना...? काही गोष्टी अश्या असतात ना की ज्यांनी थांबून किंवा त्यांना थांबवून
चालत नाही. परिस्थिती कुठलीही असो. डॉक्टर, पोलीस, पालिका यंत्रणा, आणि इतर
आपात्कालीन सेवा ह्या थांबुन चालाणारच नाही. याच सोबत अत्यंत महत्त्वाच म्हणजे शिक्षण क्षेत्र.
शिक्षण क्षेत्रावरून आठवलं परवा एका मित्राने विचारलं, “सध्या ज्या ऑनलाईन शाळा सुरु आहेत त्याबद्दल तुला काय वाटतं?” मुळात मला काय वाटतं, याचा विचार सध्या करतय कोण...? इथे ‘मला’ ही संज्ञा मी माझ्या स्वतःसाठी वापरली नसून समस्त सामान्य किंवा मध्यम वर्गीय माणसासाठी वापरली आहे. कारण जरा खोचक वाटेल पण एक उदाहरण देतो. कोरोना मुळे लॉकडाउन सारखे कठोर पण आवश्यक पाऊल सरकारला उचलावे लागले. यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कामं थांबली, आवक थांबली. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात आहे त्यांना काही प्रॉब्लेमच नव्हता. त्यांना हा निर्णय योग्य वाटला. तो होताही. कारण ते आवश्यक होतं. तळागाळातल्या गरीब लोकांना हा निर्णय अन्याय वाटला. कारण आज कमवा आणि आज खा..असे त्यांचे जीवन होते. कमाई नाही तर खाणेही नाही. म्हणून त्यांची चिडचिड झाली. मग अश्यांना ज्यांच्याकडे सगळं मुबलक आहे त्यांनी समाजसेवा म्हणून किंवा या समाजाच आपण काही देणं लागतो या तत्त्वाखाली जशी जमेल तशी मदत करायला सुरुवात केली. पण समाजाच्या या दोन टोकांमध्ये एक थांबा येतो...तो म्हणजे मध्यमवर्गीय माणूस. या मध्यम वर्गीय माणसाबद्दल कुणीही विचार करत नाही. स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी त्याला रोज काय काय कसरत करावी लागते हे त्यालाच माहिती असतं. कारण त्याचे कुठलेच हफ्ते बंद झाले नसतात. या सगळ्या हफ्त्यात एक महत्त्वाचा हफ्ता येतो,,, मुलांच्या शाळेचा हफ्ता.
शाळा सुरु कराव्या की नको या गोंधळात
एकदाच्या शाळा सुरु झाल्या. पण ऑनलाईन. छोटी छोटी मुलं, तासंतास लॅपटॉप, कंप्युटर, मोबाईल,
याच्यासमोर इच्छा नसतानाही बसू लागली. आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. नव्या
व्हर्च्युअल क्लासेसची. पण मुले या प्रकारे खरच शिकायला लागली का किंवा त्यांना या सगळ्यात इंटरेस्ट असतो का? हा मात्र मोठा प्रश्न आहे. या सगळ्यात शाळा मात्र खऱ्या अर्थाने मागे पडली. एकत्र,
एकसाथ, एकसुरात होणारी प्रार्थना, ती शाळेची बेल, मधली सुट्टी, मित्रांसोबत एकत्र
बसून खाल्ला जाणारा डबा, नव्या पुस्तकांचा सुवास, रोजची हजेरी, शालेय शिस्त, आणि
शाळा हे सगळं कुठल्या कुठे विरून गेलं. मुलांच्या शाळेसोबत आता ह्या कसरतीचा अर्धा शेअर
पालकांना ही उचलावा लागला.
माणूस हा मुळातच समाजशील प्राणी....त्यामुळे जेव्हापासुन लॉकडाउन सुरु झाले तेव्हा पासून सगळी मंडळी घरात राहू लागली. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढू लागला त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई होती. बाह्य जगाशी त्याचा संबंध कमी झाला. त्यामुळे घरून ऑफिसची कामं होऊ लागली, आणि ह्या सगळ्यात अजून एक काम वाढले, ते म्हणजे मुलांसोबत पालकांना त्याच्या ऑनलाईन शाळेसाठी बसावे लागले. प्रत्येक शाळेची क्लासेसची वेळ, त्याच्या वर्गाचा कालावधी वेगवेगळा आहे. वेगवेगळ्या शाळांच्या क्लासेसची सरासरी वेळ जर काढली तर क्लासला साधारण २ तास तरी त्या मुलाला या व्हर्च्युअल क्लाससाठी मोबाईल किंवा कम्प्युटरसमोर बसावे लागते. सहाजिकच त्या पालकाला आपल्या पाल्यासोबत शाळा पूर्ण होतपर्यंत बसावे लागते. कारण कधी इंटरनेट कनेक्शन ठीक नसते तर कधी आवाज कमी येतो.तर कधी शिक्षक नेमक काय बोलले त्यांनी काय शिकवले हे मुलांना कळत नाही आणि ती उणीव मग पालकांना भरून काढावी लागते. त्याचसोबत दिवसभरात दिलेला गृहपाठ पूर्ण करवून घ्यावा लागतो. म्हणजे पूर्ण दिवस मुलांची तयारी पण पालकांनीच करायची आणि शाळेला फी पण त्यांनीच द्यायची. It is actually Ridiculous.
या सगळ्यात एका गोष्टीच खूप समाधान
वाटते कि, जे शिकवलं जातंय त्याची पुनरावृत्ती परत एकदा पालकांच्या आयुष्यात होते.
शिकवण्याच्या पद्धती बदलल्या असतील पण परत एकदा पालकांना आपल्या पाल्यामुळे शाळेत गेल्याच
आणि त्या अभ्यासाच सुख मिळतंय.कारण शाळेची मजा, त्यातला आनंद, त्यातलं सुख काही
औरच होत. शाळेचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सुवर्ण दिवस असतात. एकदा ते
सरले की ते परत येत नाही. पालकांनी जगलेले ते दिवस अगदी जसेच्या तसे नाही पण मुलांमुळे
पुन्हा ते सुख अनुभवता येत आहे याचे समाधान नक्कीच आहे. मुलांना घेऊन बसण्यात ,
कामात जरा वेळ काढून यात गुंततांना मन मात्र हळुवार इतिहासाची पानं अलगद उघडून
वर्गात जाऊन बाकावर कधी विसावलेलं असत कळतही नाही. कानी फक्त येत असतो शिक्षकांचा शिकवण्याचा
आवाज. डोळ्यासमोर येतं, मराठीच व्याकरण, भूमितीचे प्रमेय, इतिहासातले पात्र, भूगोलाचा
व्याप, इंग्रजी शब्दांची मेंदूत घुसण्यासाठी चाललेली तळमळ, गणितातलं कोडं, आणि विज्ञानाचे प्रयोग...
जरा दगदगीच असलं, तरी हे सगळ सुखावह
वाटते....पण सत्य शेवटी भयानक असत. कारण हि बाजू झाली पालकांच्या भावनेची, पण एका
नाण्याला जश्या दोन बाजू असतात, तशी यालाही आहे. दुसरी बाजू म्हणजे, प्रत्येक
शाळेची एक स्पर्धा चाललेली आहे कि कसेही करून शाळा सुरु ठेवायची..त्यामागे त्यांचा
स्वार्थ नक्कीच आहे की, शाळेची जी दुकानदारी जम धरून बसलीय ती या कोरोनाने, बंद
पडू नये.....जरा स्पष्ट आहे पण खर आहे. कारण या लोकांना शिक्षाणाचे काही घेणे देणे
नाही. त्यांना यात दिसतो. तो फक्त बिझनेस. शिक्षणाचे महत्त्व आणि त्यातले
पुण्यकर्म त्यांना कळले असते तर यांनी LKG/UKG सारख्या साध्या वर्गांची फी
लाखाच्या घरात ठेवली नसती. कारण शाळा आता शाळा राहिल्या नसून International School झाल्या आहेत. आणि एक शाळा जेव्हा School होते तेव्हा
विद्यादानाचे उद्दिष्ट बाजूला राहून व्यवसाय सुरु होतो.
१९९९ ते २००० पर्यंत शाळा हे एक विद्यादानाच केंद्र होत. त्यानंतर मात्र त्याच स्वरूप बदलून, त्याला व्यावसायिक स्वरूप आलं. ज्यात फक्त पैसा असलेल्या पालकांच्या मुलांनाच प्रवेश, उत्तम आणि नीटनेटका ड्रेस, सुरक्षा, शाळेच्या स्पेशल बसेस, आणि शेवटी जमलच तर शिक्षण आणि ते ही मातृभाषेला किनारा देऊन इंग्रजी शिक्षण माध्यमातून, असे निकष ठेवण्यात आले. काही मोजक्याच शाळा खऱ्या अर्थाने शाळा राहिल्या. ह्या सगळ्याला सिस्टीम किंवा त्या संस्था जेवढ्या जवाबदार आहेत तेवढेच आपणही .कारण आपण शाळेचा मूळ उद्देशच विसरलो. त्यांनी मागितलेली लाखाच्या घरातली फी आपण सहज देऊ लागलो, कारण आपल्याला वाटले की, मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली की, अधिक जास्त प्रगल्भ होतील. पण एक आवर्जून सांगतो, काही वर्षातच आपल्या डोळ्यावरचा हा पडदा दूर होईल. कारण मातृभाषेतलं घेतलेलं शिक्षण हे मुलांना जास्त प्रगल्भ करत हे सिध्द झालय. आज या कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात १००% नाही पण काही टक्के पालकांना हे नक्की कळून चुकलय कारण त्यांना अश्याही परिस्थितीत पूर्ण फी भरावी लागतेय. आणि त्याला सरकारने सुद्धा काही पर्याय ठेवला नाही. ऑनलाईन शाळा आहे म्हणून फी अर्धी घ्यावी कारण परिस्थिती सगळ्यांचीच खराब आहे, असे काही मुद्दे मधल्या काळात उठले जरूर पण त्याचा काही फायदा झाला नाही. शाळांना आदेश देण्यापेक्षा उलट सरकारने सामान्य नागरिकांनाच पर्याय दिला की, लॉकडाऊन संपल्यावर ३ महिन्यांनी फी भरा. तो पर्यंत नाही दिली तरी चालेल. आणि शेवटी मरण झाले ते मध्यम वर्गीय सामान्य माणसाचेच.
या सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे
शिक्षक. ते ही सामान्य नागरिकांतच मोडतात. इतरांसारखे त्यांनाही आयुष्य आहे.
मुलांना दुसऱ्या दिवशी शिकवायचे म्हणजे त्यांनाही पुढच्या दिवसाचा अभ्यास करावा
लागतो,त्यासाठी तयारी करावी लागते. त्यांच्यासाठीही हे सगळं नवीनच होतं. ते सुद्धा
दिवसभर सगळी कामं करून हे काम करतात. निश्चितच त्यांना याचा पगार मिळतो.पण हे काम
ते आवडीने आणि इमानदारीने करतात. फक्त आता चिंता वाटत होती गावातल्या, दुर्गम
भागातल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची. कारण तिथे ना इंटरनेट होते ना महागडे मोबाईल
किंवा कंप्युटर. पण म्हणतात ना की इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. भामरागड,गडचिरोली
इथे कोरोनामुळे सुट्टीत घरी परत गेलेल्या
विद्यार्थ्यांना संचारबंदीमुळे परत शाळेत येता येत नव्हते, आणि दुर्गम भागात घरे
असल्याने इंटरनेटही नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये,
इतरांप्रमाणे त्यांनाही शिक्षण नियमित मिळावे यासाठी, लोकबिरादरी आश्रम शाळेचे (हेमलकसा)
संचालक अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा
आमटे यांच्या संकल्पनेतून “शिक्षण तुमच्या दारी” हा उपक्रम राबवला गेला. भामरागडच्या
दुर्गम भागात जिथे जिथे हे विद्यार्थी
राहतात त्या ठिकाणी जाऊन झाडाखाली , किंवा मोकळ्या जागेत सरकारच्या आदेशांचे पालन
करत, सोशल डिस्टन्स ठेवून ह्या शाळा सुरु केल्या गेल्या आणि याप्रकारे शिक्षक
शिकवू लागले आणि विद्यार्थी आनंदाने त्यांचे शिक्षण घेऊ लागले. हि या सगळयामधली
अत्यंत समधानकारक बाब आहे.
शाळेचे बाजारीकरण करणारे करत
राहतील, कठीण काळातही ते व्यवसायाच्या संधी शोधत राहतील. पण आयुष्यभर लक्षात तेच
राहतील ज्यांना विद्यादानाचे खरे व्रत कळले आहे. शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे
आणि तो मिळालाच पाहिजे.
वास्तव लिहिलंयस....खरंय....पण ऑनलाईन शाळेमुळे मुलांचा अभ्यास बुडत नाहिये हे ही खर
ReplyDeleteHo te hi kharay.
Deleteसौ सं मांडे
ReplyDeleteखूप छान लेख 👌👍
Very true Amol.We all are facings problem of slow internet connections, still online classes are going on, which is burden for all students.
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteअगदी छान ओझस. आपली लेखन शैली उत्तम आहे. शिवाय विषय सुद्धा योग्य आहेत. मी तंत्रज्ञानाबद्दल जास्त लिहितो माझ्या साईट ची लिंक www.alotmarathi.com आपल्या साठी या वरील माहिती नक्कीच उपयोगी पडेन.
ReplyDeleteनमस्कार मित्रांनो,मी प्रकाश. ऑनलाईन पैसे कसे कमवायचे आणि ब्लॉगिंग कसे करावे याबद्दल माहिती मिळेल. माझ्या वेबसाईटची लिंक http://marathikaushalya.in आपल्यासाठी व सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल.
ReplyDeleteSo nice blog.
ReplyDelete